हि प्रेरणादायी कथा वाचा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.

 सत्य जाणून न घेता कोणाविषयीसुद्धा कोणतेही मत मांडू नये

एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते. बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचली. पिता-पुत्राला वाटले की आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे. तिरही दोघेजण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना गेले. यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

मुलाने देवाकडे प्रार्थना केली- हे देवा! या बेटावर फळ-फुल लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत ज्यामुळे माझी भूक मिटेल. लगेच त्या बेटावर रसरशीत फळांची झाडे उगवली. मुलाला हा तर चमत्कार झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की- हे देवा! मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावी. त्याचक्षणी किनाऱ्यावर एक नाव आली. तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली- हे मुला तू एकटाच जात आहेसतुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही कामुलगा म्हणाला- त्यांना सोडून द्याप्रार्थना तर त्य्नाहही केली असेल तर परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही. कदाचित यांचे मन पवित्र नसेलत्यामुळे त्यांना याचे फळ भोगू दे.

आकाशवाणीने सांगितले- तुला माहिती आहे कातुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होतीमुलगा म्हणाला- नाही. आकाशवाणीने सांगितले की तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली- हे देवा! माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाकावे. आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनाही सोबत घेऊन गेला.

लाईफ मॅनेजमेंट

अनेकवेळा आपण सत्य जाणून न घेताकोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो. हे अनेकदा चुकीचेही ठरते. यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरे जावे लागते. यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित करू नये.


Related Posts

तुमच्या जीवनात प्रेरणा देण्यासाठी आमचे एक प्रयत्न.
 • Facebook
 • WhatsApp
 • Instagram
 • Subscribe Our Newsletter

  0 Response to " सत्य जाणून न घेता कोणाविषयीसुद्धा कोणतेही मत मांडू नये"

  Post a comment

  Medium Ad Section 0

  Medium Ad Section 1

  Medium Ad Section 2

  Article advertising