"आत्मविश्वास....."
The invisible power....
आत्मविश्वास
वाढवण्यासाठी तसं भरभरुन लिहलं आणि बोललं जातं, पण
तरीही बऱ्याचदा, नेमकं काय करायचं ह्याविषयी गोंधळ कायम
राहतो. तर मी आज तुम्हाला नेमक्या, मोजक्या शब्दांत सात
टिप्स सांगणार आहे.
१. कशीही परिस्थिती असो, चांगलाच
विचार करायचा
आयुष्यात दोन्ही प्रकारच्या परिस्थीती येतात, कधी
दुःखाचे, वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं
असतचं. फक्त तेवढं शोधुन काढायचं. त्या प्रसंगातुन बोध घ्यायचा, बाकीचं विसरुन, हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायचं.
“या तो मै जीतता हुं, या
सीखता हुं”…
२. मी कसा आहे, मला माहितीय
कधी कधी आपल्या वस्तुवर किंवा वागण्यावर टिका होते. जवळच्या
माणसांचे शब्द जास्त वेदना देतात, टिकेतुन स्वतःमध्ये काय
काय सुधारणा करता येईल? फक्त एवढाच विचार करायचा, बाकी विसरुन जायचं, बाकी त्याविषयी जास्त चिंतन,
चिंता अणि चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही, फार
लोड घ्यायचा नाही, सरळ डिलीट मारुन मोकळं व्हायचं.
३. माझा माझ्यावर विश्वास आहे.
एखादं काम नवीनच करायचंय, मला
हे जमेल का नाही? असे विचार मनात येतात, तेव्हा आरशासमोर उभं रहायचं, आणि हे वाक्य म्हणायचे,
मी प्रचंड शक्तिशाली आहे, हे काम मी सहज,
चुटकीसरशी, करु शकतो. मी ताकदवान आहे, माझा माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर पुर्ण विश्वास आहे. मी असामान्य आहे.
आणि अशीच अजुन जी वाक्य तुम्हाला सुचतील ती सारी वाक्ये
म्हणु शकता. काम करायला एक वेगळीच शक्ती मिळते.
४. माझा कृती करण्यावर विश्वास आहे.
नुसतं बोलल्याने काम होत नाही, ती
फक्त सुरुवात असते, सळसळत्या उत्साहाने, आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला हात घालायचा. यश मिळेपर्यंत चिकाटीने
काम करत रहायचं. लवकरच काम फत्ते होतं. त्या कामातुन मिळालेला आत्मविश्वास पुढच्या
कामात वापरायचा.
५. मी धैर्याने आणि नियोजनपुर्वक भीतीचा सामना करतो.
एखादं अवघड काम करताना भीती वाटतेच, तिला
थारा द्यायचा नाही, तिला घाबरायचं नाही आणि तिला मनात जास्त
रेंगाळु द्यायचं नाही, हसत हसत तिचा सामना करायचा, आपण आनंदाने काम करत राहीलो, तिला भाव नाही दिला की
ती आपोआप पळुन जाते.
६. मी माझ्या उणीवा शोधतो, आणि
त्या दुर करतो.
कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये मी काय सुधारणा केली असा
प्रश्न रोज स्वतःला विचारायचा. तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमच्या
स्वतःशी आहे, म्हणजे आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा
उद्या जास्त यशस्वी होत राहु.
७. मी यशस्वी लोकांसारखी ‘बॉडी
लॅंग्वेज’ वापरण्याचा सराव करतो.
प्रत्येक यशस्वी माणसांमध्ये हसरा, प्रसन्न
चेहरा, रुबाबात ताठ चालणं, वॉर्म
हॅंडशेक, बोलताना हातांची अर्थपुर्ण हालचाल, समोरच्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलणं, स्पष्ट खणखणीत
आवाज, नर्मविनोदी शैली, ह्या सगळ्या
गोष्टी असतात, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करत करत, त्यांच्याकडुन सतत शिकत स्वतःचं डॅशिंग व्यक्तीमत्व बनवायचं.....
Related Posts

Subscribe Our Newsletter
0 Response to "आत्मविश्वास.....The invisible power...."
Post a comment