तीन हात नाका सिग्नल ते युरेका फोर्ब्स.सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्याचा रोमहर्षक प्रवास.

0

तीन हात नाका सिग्नल ते युरेका फोर्ब्स.सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्याचा रोमहर्षक प्रवास.

inspirational stories motivational stories motivational story in hindi inspirational moral stories inspirational short stories motivational story in e

 गेली २२ वर्ष ठाण्याच्या सिग्नलवर भिक्षेकरी म्हणून दिवस ढकलणाऱ्या प्रभू काळे यांचा मुलगा मोहन काळे सिग्नल शाळेच्या संपर्कात आला. एकेकाळी वडीलांसोबत सिग्नलवर दिवस घालवणारा मोहन पाहता-पाहता दहावी व पुढे चक्क डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकल इंजीनिअरिंगची परीक्षा पास झाला. डिप्लोमा झालेला मोहन आता युरेका फोर्ब्स नावाच्या कंपनीत रुजू झाला. सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या रोमहर्षक प्रवासाने रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या.

समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वर्षांपूर्वी तीन हात नाका सिग्नल पुलाखालील वसलेल्या  १८ कुटुंबांतील जवळपास ५० मुलांसाठी पुलाखालीच सिग्नल शाळा सुरु झाली. ५ वर्षांपूर्वी मोहन काळे सिग्नल शाळेत दाखल झाला. तेव्हा त्याचे वय दहावीत बसण्याइतके होते. मात्र पारंपरिक शिक्षणाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मोहन काळेला सिग्नल शाळेत आठवीत दाखल करण्यात आले. तर पुढील वर्षी मोहन तयारीनीशी दहावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला. दहावीत ७२% मिळवून त्याने सिग्नल शाळेचा विश्वास संपादीत केला. त्यामुळे त्याच्या उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मदतीने मोहन काळे रुस्तमजी ग्लोबल करीअर इन्स्टीट्यूटमध्ये डिप्लोमा इन इलेट्रीकल इंजीनिअरिंगचा अभ्यास करू लागला.

एक पाय नसलेला आपला भिक्षेकरी बाप व वयाने खंगलेली आई यांच्यासाठी आपण एकमेव आधार आहोत अशी खूणगाठ मनाशी बांधून मोहनने २ वर्षाचा डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केला. या काळात बालस्नेहालय संस्थेच्या वसतिगृहात राहून त्याने अभ्यासासाठी खडतर परिश्रम घेतले. डिप्लोमा नंतरच्या कँम्पस मुलाखतीत युरेका फोर्ब्स कंपनीत मोहनची निवड झाली आणि सिग्नल शाळा ते युरेका फोर्ब्स असा खडतर व रोमहर्षक प्रवास मोहन काळे याने यशस्वी केला.

रस्त्यावरील मुले देखील उज्जवल यश संपादीत करू शकतात व मान सन्मानाने समाजात उभे राहू शकतात याचा वस्तूपाठ मोहनने घालून दिला. भविष्यात  इलेट्रीकल इंजीनिअरिंगमध्ये मास्टर करण्याचा मानस आहे. माझ्या यशामुळे सिग्नल व रस्त्यावरील इतर मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली तर मला जास्त आनंद होईल अशी प्रतिक्रिया मोहन याने व्यक्त केली.

TAG-inspirational stories#motivational stories#motivational story in hindi#inspirational moral stories#inspirational short stories#motivational story in marathi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !