नक्षलग्रस्त भागात आधी झाली IPS आणि नंतर IAS होण्याचं स्वप्नही असं केलं पूर्ण

0

 नक्षलग्रस्त भागात आधी झाली IPS आणि नंतर IAS होण्याचं स्वप्नही असं केलं पूर्ण

Inspirational,upsc,motivational stories

IAS IPS होण्याचं स्वप्न अगदी लहानपणापासून पाहिलेलं असतं किंवा एखादी घटना आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. अशीच एक घटना नम्रता जैन यांच्या बाबतीत घडली. लहानपणी नक्षलग्रस्त भागात पोलीस चौकीला लागलेली आग पाहून त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय मनाशी पक्का केला.नम्रता जैन या मूळच्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी.
याआधी दंतेवाडा इथून कोणीच UPSC परीक्षेत आजवर सिलेक्ट होऊ शकलं नाही. पण ही भीती मनातून काढून नम्रता यांनी परीक्षेची तयारी केली.नम्रता यांचे सुरुवातीचे शिक्षण नक्षली क्षेत्र असलेल्या दंतेवाडा इथे झाले. नम्रताने भिलाई इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर UPSC परीक्षेची तयारी केली. 2015 मध्ये नम्रता यांना पहिल्या प्रयत्नात यश आलं नाही
. त्यावेळी खचून न जाता त्यांनी पुन्हा तयारी केली. आधीच नक्षलग्रस्त भागातून आणि त्यामुळे पदरी सतत अपयश मिळत असल्यानं नकरात्मक विचारांना आणि भावानांवर नियंत्रण ठेवण्याचं काम नम्रता यांनी केलं.2016 मध्ये मात्र नम्रता यांनी 99 वा क्रमांक मिळवून यशस्वी झाल्या. या टप्प्यावरही, दंतेवाडामधून निवड झालेल्या त्या पहिल्याच उमेदवार होत्या, तरीही त्यांच्याकडे नाव नोंदण्यासाठी अद्याप अनेक नोंदी आहेत. नम्रताला रँकनुसार आयपीएस सेवा मिळाली. मात्र IAS होण्याचं स्वप्न मनाशी कायम पक्क होतं. त्यांना हैदराबाद इथे आपलं प्रशिक्षण घेतलं.

कामासोबतच IAS साठी त्या तयारी करायला लागल्या. नम्रता यांच्या कष्टाचं चीज झालं. 2018 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा भारतात 12 वा क्रमांक आला. नम्रता यांचं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर लख्ख दिसत होता.'UPSCच्या तुम्हाला संपूर्ण प्रवासात संयम ठेवावा लागेल, तुम्हाला यश मिळणार नाही, चुका होतील पण तुम्हाला धैर्य गमवून लागणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुसंगतता.
आपण जे काही वाचता ते रोज वाचा आणि काही वर्षे मित्र आणि नातेवाईकांना विसरा. एकदा यशस्वी झाल्यानंतर आपण या सर्वांशी कनेक्ट होऊ शकता, असं नम्रता जैन यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे.'

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !