याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

0

 याला म्हणतात जिद्द! अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

Inspirational,upsc,mpsc,success stories


महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत 143वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने 2018मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा 937वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. 2018मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीनं यंदा जयंतने 143वा क्रमांक मिळवला.

जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून 2013 मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र IESमध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

2015पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2017मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !