शिष्यवृत्ती: कोटक कन्या स्कॉलरशिप 2023

विस्तृत माहिती:

कोटक महिंद्रा ग्रुप कंपन्यांच्या शिक्षण आणि उपजीविकेवरील सीएसआर (CSR) प्रकल्पांतर्गत, कोटक एज्युकेशन फाऊंडेशनद्वारे  85% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 6,00,000 (रुपये सहा लाख) पेक्षा कमी किंवा समतुल्य आहे अशा 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनींकडून कोटक कन्या स्कॉलरशिप 2023साठी अर्ज मागवले गेले आहेत. या स्कॉलरशिपचे उद्दिष्ट समाजातील वंचित घटकांतील गुणवंत विद्यार्थिनींना नामांकित युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमधून प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत करणे हा आहे.

पात्रता/ निकष:ज्या गुणवंत विद्यार्थिनींनी नामांकित संस्थां (NAAC/NIRF मान्यताप्राप्त)मधून प्रोफेशनल अभ्यासक्रमांमध्ये 1ल्या वर्षाच्या ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवला आहे त्या अर्ज करू शकतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग, एमबीबीएस (MBBS), आर्किटेक्चर, डिझाइन, इंटिग्रेटेड एलएलबी इत्यादी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा समावेश होतो.
अर्जदारांनी त्यांच्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रुपये (रुपये सहा लाख) किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पुरस्कार आणि पारितोषिके:प्रति वर्ष 1.5 लाख* रुपये

शेवटची तारीख:30-09-2023

अर्ज करण्यासाठी लिंक: www.aapalathakare.com

अर्ज करण्याची लिंक- www.aapalathakare.com

Scholarship Alert! Join Now - https://telegram.me/ScholarshipAlertt

Scholarship Alert! Join Now -