पॅन आणि आधार जोडणीस जून 2023 पर्यंत मुदतवाढ | Last date for linking of PAN-Aadhaar extended

प्राप्तिकर कायदा, 1961 ('कायदा') च्या तरतुदींनुसार 1 जुलै, 2017 रोजी पॅन वाटप करण्यात आलेल्या आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विहित प्राधिकरणाला त्याचे आधार सूचित करणे आवश्यक आहे.
पॅन निष्क्रिय होईल आणि पॅन निष्क्रिय राहण्याच्या कालावधीत त्याचे परिणाम 

  • अशा पॅनसाठी कोणताही परतावा दिला जाणार नाही;
  • ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय राहते त्या कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाहीआणि
  • TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील/संकलित केले जातील, कायद्यात प्रदान केल्याप्रमाणे.

1,000 रुपये शुल्क भरल्यानंतर विहित प्राधिकरणाला आधारची माहिती दिल्यानंतर 30 दिवसांत पॅन पुन्हा चालू करता येईल.

पॅन आणि आधार लिंक (PAN and Aadhaar link) करण्याच्या उद्देशाने आधारची माहिती विहित प्राधिकरणाला देण्याची तारीख आता 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Linking of PAN-Aadhaar extended